अँटिलिया स्फोटक प्रकरण, बोगस पुराव्यासाठी परमबीर सिंह यांनीच दिली ५ लाखांची लाच

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एजन्सीमधील एका सायबर तज्ज्ञांनी धक्कादायक माहिती दिली आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटिलिया कांड प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिन्द नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा एक्सपर्टने केला आहे. यासाठी परमबीर सिंह यांनी सायबर तज्ज्ञाला पाच लाखांची लाच दिली असल्याचेही त्याने सांगितलं आहे. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळच्या अधिकाऱ्याचा जबाब देखील घेण्यात आला. त्या अधिकाऱ्यानं देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन त्याने लाख रुपए सिक्रेट सर्व्हिस फंडातून काढून सायबर एक्सपर्टला दिले होते.

जानेवारीत दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला होता. याची जबाबदारी जैश-उल-हिंद संघटनेने घेतली होती. त्याचा फायदा घेत परमबीर सिंह यांनी मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर स्फोटक प्रकरणात जैश-उल-हिंदचे नाव घुसवण्यासाठी लाच दिली. इस्रायल दूतावासासमोर झालेला ‘ब्लास्ट’ दहशतवादी संघटनेशी जोडला गेला व त्याची पाळेमुळे तिहार जेलमध्ये सापडली होती. तसे करण्यासाठी परमबीरसिंग यांनी सायबरतज्ज्ञांना विश्वासात घेतले. यासंदर्भात मी एनआयएच्या आयजींशीही बोलणार आहे असे त्यांनी सांगितले. यासाठी त्या तज्ज्ञास परमबीर यांनी कार्यालयात बोलावले होते. तिथे त्याने अहवालात बदल केला, असे सायबरतज्ज्ञाने त्याच्या जबाबात म्हटले आहे.

तपास यंत्रणेला सुरुवातीपासूनच अँटिलिया प्रकरणात समोर आलेल्या जैश उल हिन्दच्या षडयंत्रात परमबीर सिंह यांचा सहभाग असल्याता संशय आहे. मात्र त्यांनी आपल्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंह यांचा रोल काय आहे याबाबत काही लिहिलेलं नाही. मात्र आता सायबर एक्सपर्टनं परमबीर यांचं नाव घेतलं आहे.

अँटालिया स्फोटके प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘जैश-उल-हिंद’च्या टेलिग्रामवरील पोस्टबाबत अहवाल सादर करणाऱ्या सायबर तज्ज्ञाने एनआयए सांगितले की, त्याचा अहवाल प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी प्रकरणाशी संबंधित नाही. अहवालात सुधारणा करण्याचे आदेश तत्कालीन मुंबई पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी मला दिले होते. यासाठी तीन लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले. मात्र, पाच लाख रुपये दिले. त्याने दिलेल्या सेवेसाठी तो इतके पैसे मिळवण्यास पात्र आहे, असे सिंह यांनी म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या