‘या’ दोन अटींवर परमबीर सिंह यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द

‘या’ दोन अटींवर परमबीर सिंह यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द

Parambir Singh

ठाणे: गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) हे मुंबईत परतले आहेत. त्यांच्यावर असलेल्या वेगवेगळ्या आरोपांवर गुन्हे शाखेने (Crime Branch) त्यांची तब्बल सात तास चौकशी केली आहे. गुन्हे शाखेची ही चौकशी पूर्ण झाली असून परमबीर सिंहांनी त्यांच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळल्याची माहिती समोर येत आहे.

कांदिवलीत गुन्हे शाखेच्या कार्यालयात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सात तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज ते ठाण्यात दाखल झालेत. ठाण्यात परमबीर यांच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. परमबीर सिंह विरोधातला अटक वॉरंट ठाणे कोर्टाने (Thane Court) रद्द केले आहे. ठाणे कोर्टाने वॉरंट रद्द करताना परमबीर सिंह यांना कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांना सध्या तरी तात्पुरता कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

अटक वॉरंट जरी रद्द झालं असलं तरी ठाणे कोर्टाने दोन अटी त्यांच्यावर घातल्या आहेत. परमबीर सिंह यांना जेव्हा तपास अधिकरी चौकशीसाठी बोलावतील तेव्हा परमबीर सिंह यांनी तपाससाठी उपस्थित राहायचे आहे. तसेच १५ हजाराच्या वैयक्तिक जामीनवार त्यांचे वॉरंट रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परमबीर सिंह तपासासाठी दाखल झाल्याची प्रतिक्रिया परमबीर सिंह यांनी दिली आहे. तसंच तपासात सहकार्य केलं असल्याचही ते म्हणाले. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होईल, असंही परमबीर सिंग यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या: