बदली केल्यानेच परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केले-अनिल देशमुख

मुंबई : अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेले जिलेटीन आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू या दोन्ही घटनांमागे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणामुळे मी परमबीर सिंग यांची बदली केली. बदली केल्यामुळेच त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले असल्याचा दावाही त्यांनी केलाय. यामुळे सीबीआयने माझ्यावर दाखल केलेला गुन्हा खारीज करावा अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयात केली आहे.

या संदर्भात अनिल देशमुख म्हणाले की, परमबीर सिंग आणि वाझे या दोघांचीही या प्रकरणातील भूमिका संशयास्पद वाटत होती. त्यामुळे त्यांच्याकडे सुरू असलेला तपास काढून एटीएसकडे सोपवण्यात आला होता. तसेच त्यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली होती. त्यामुळे परमबीर सिंग यांनी आपल्यावर खोटे आरोप केले. माझ्या ३० वर्षाच्या राजकीय प्रवासात माझ्यावर एकही आरोप नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

https://twitter.com/AnilDeshmukhNCP/status/1389626543450693636

अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘अँटीलिया व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात परमबीर सिंग व सचिन वाजे यांची भूमिका संशयास्पद असल्याने सिंग यांची बदली करण्यात आली. यातून सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यानुसार सीबीआयने माझ्यावर दाखल केलेला गुन्हा खारीज करण्यासाठी मी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.’

या प्रकरणाचा तपास आता ‘एनआयए’ करत आहे. ही अत्यंत चांगली तपास संस्था असून या प्रकरणातील सत्य लवकरच सर्वांसमोर असेल असा दावाही देखमुख यांनी केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ कडे देण्यासाठी आधी महाविकास आघाडीमधील नेत्यांनीच विरोध केला होता.

महत्त्वाच्या बातम्या