परळीतील रेल्वे रुळावर सिमेंटचा ब्लॉक; घातपाताची शक्यता

बीड : परळीत रेल्वे रुळावर सिमेंटचा ब्लॉक ठेवल्याची माहिती समोर आली आहे. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मालेवाडीहून परळीला येणाऱ्या मालगाडीला मोठा अपघात टळला. रेल्वेरुळावर सिमेंटचा ब्लॉक ठेवण्यामागे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. या मार्गावर परळी – हैद्राबाद रेल्वे येण्याआधी एक मालगाडी परळीकडे आली. त्या मालगाडीने हा सिमेंट ब्लॉक किमान शंभर फूट ओढत नेला. या मालगाडीमुळे रेल्वे ट्रॅकच्या चाव्याही निखळून पडल्या. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

You might also like
Comments
Loading...