परळीच्या तहान भागवण्यासाठी आता आल्यात ‘वॉटर व्हीलर’

परळी : परळीच्या भाजपा आमदारांनी स्वतःच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला वाण धरणातुन अमर्यादित पाणी घेतल्यामुळेच परळी शहराला पाण्याची टंचाई भासत असून पाण्याअभावी परळीकरांच्या होणाऱ्या हालअपेष्टांना त्याच जबाबदारी आहेत असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ. अजित पवार व ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ ते २२ जुलै विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत आज दि.१९ लै रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे वाॅटर व्हिलर वितरण समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.

Loading...

स्वतःच्या वैद्यनाथ कारखान्याला परळीचे पाणी घेतले मात्र शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले नाहीत आणि परळीकरांचे पाणीही पळवले असा आरोप करून नगरपालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा वाटप करण्यापेक्षा पालकमंत्री आणि या भागाच्या आमदार म्हणून परळीतल्या जनतेला पाणी देण्यासाठी त्यांनी काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

समाजातील प्रत्येक घटकांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी माझे सहकारी सातत्याने आधार देतात याचा आनंद वाटतो असे सांगून वाॅटर व्हिलर वितरणाचा उपक्रम घेण्याची वेळ येउ नये परंतु भीषण पाणी संकटच इतके झाले आहे की सर्वच जलसाठे संपले आहेत. या परिस्थितीत पाणी वाहून आणण्यासाठीचा आपल्या डोक्यावरील भार वाॅटर व्हिलर वितरण करुन कमी करण्याचा प्रयत्न आहे.

परळी शहराला खडका बंधाऱ्यातून पाणी पुरवठा करण्यासंदर्भात सातत्याने आपण सरकारकडे पाठपुरावा केला असून हे पाणी आपल्याला लवकरच उपलब्ध होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी प्रास्ताविकातून आधार महोत्सवातील विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.

काय आहे वॉटर व्हीलर ?

वॉटर व्हीलर ज्यामध्ये तीन घागरी पाणी साठवले जाते आणि पन्नास लिटर पाणी अगदी अलगद ढकलत घरापर्यंत आणले जाते. पाणीटंचाई परिस्थितीचा विचार करता वाॅटर व्हिलर निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'