मुंबई: ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून लवकरच पायउतार होणार आहेत. त्यानंतर ट्विटरचे (Twitter)मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल (Parag Agarwal)यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे कंपनीने सोमवारी जाहीर केले आहे. आता यावरच वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान यावरच टेस्ला (Tesla) चे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी देखील कौतुक केले आहे.
भारतीय व्यक्तींच्या प्रतिभेचे कौतुक करत त्यांनी ट्विट केले आहे. स्ट्राईप कंपनीचे (Stripe Company) सीईओ आणि को-फाउंडर पॅट्रिक कोलीसन (Patrick Collison) यांच्या ट्विटला रिप्लाय करत मस्क यांनी लिहिले की, भारतीय टॅलेंटमुळे अमेरिकेला फायदा झाला आहे.
पॅट्रिक यांनी पराग अग्रवाल यांना शुभेच्छा देत ट्विट केले की, ‘Google, Microsoft, Adobe, IBM, Palo Alto, Networks आणि आता Twitter च्या प्रमुखपदी असलेले सर्वजचण भारतात मोठे झाले आहे. टेकच्या जगतात भारतीयांना यशस्वी होताना पाहून नक्कीच आनंद वाटतो.’ सोबतच, त्यांनी पराग यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
USA benefits greatly from Indian talent!
— Elon Musk (@elonmusk) November 29, 2021
दरम्यान पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. ते २०११पासून कंपनीच्या सेवेत आहेत. २०१७ मध्ये त्यांची कंपनीचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जॅक डॉर्सी(Jack Dorsey) सीईओपदाचा राजीनामा दिला असला तरीही कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत. यावरच अग्रवाल जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया, असे ट्वीट अग्रवाल यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- शशी थरूर यांच्या ‘त्या’ ट्वीटचा मिमी चक्रवर्तींकडून बचाव; म्हणाल्या..
- …या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य
- IPL मधील टीम कायम राखण्यात येणाऱ्या खेळाडूंचा आज करणार फैसला
- भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अनिर्णीत
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<