परब म्हणाले, आम्ही लोकांसमोर कामे घेऊन जाऊ; भातखळकरांनी विचारलं, ‘खंडणीची की वसुलीची?’

मुंबई : भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही अनेक आरोप केले आहेत. त्यावर अनिल परब यांनी भाष्य केले आहे.

किरीट सोमय्या हे माझ्यावर माझ्या पक्षावर बेछूट आरोप करत आहेत. कोणतेही पुरावे नसताना खोटी कागदपत्रे दाखवून वेगवेगळे आरोप करत माझी नाहक बदनामी केली आहे. या बदनामी विरोधात मी न्यायलयामध्ये याचिका दाखल करुन 100 कोटींचा दावा केलेला आहे, असं अनिल परब म्हणाले आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना अनिल परब म्हणाल, ‘लोकांनी पालिका शेवसेनेच्या हाती दिली. त्यांचा विश्वास आहे की, शिवसेनेच्या हाती ती सुरक्षित आहे. भविष्यातही मुंबई महापालिका ही शिवसेनेच्याच हातात देतील. आम्ही कामे घेऊन लोकांपर्यंत जाणार’. परब यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी खोचक टोला लगावला आहे.

लोकांसमोर खंडणीची की वसुलीची कामे घेऊन जाणार???, असा सवाल करत भातखळकरांनी अनिल परब यांना टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या