देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सादर होणार पेपरलेस बजेट !

पेपरलेस बजेट

नवी दिल्ली : कोरोना या जागतिक महामारीच्या काळामध्ये जगातील सर्च राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना मोठा आर्थिक फटका बसल्याने मंदीच्या छायेत आहेत. याला भारतीय अर्थव्यवस्था देखील अपवाद नाही. आता अनलॉक प्रक्रीये दरम्यान अर्थव्यवस्था हळू हळू रुळावर येत आहे. सरकार देखील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पावले उचलत आहे. मात्र सरकारला देखील मर्यादा असल्याच मत नुकतच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केल होत. त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल याबद्दल सुतोवाच केले होते.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील तर 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाणार आहे. सत्राचे दोन भाग असतील. पहिला भाग 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आणि दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत होईल. संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समितीने (सीसीपीए) या तारखांची शिफारस केली आहे. यावर मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेणार आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. अधिवेशनाच्या दुसर्;या भागात अर्थसंकल्पाच्या प्रस्तावांवर चर्चा होईल. यापूर्वी सरकारने कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावले नव्हते. CCPA ने म्हटले की, अधिवेशन काळात कोरोना विषाणूशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.

या पार्श्वभूमीवर यंदा देशाच्या इतिहासात पहिल्यांदच पेपरलेस बजेट सादर होणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाची प्रिंट छापण्यात येणार नाही. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या प्रती सर्व खासदार, माध्यमे यांना दिल्या जातात. हि परंपरा यावर्षी खंडित होणार आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पा आधी केले जाणारे सर्वेक्षण देखील छापले जाणार नाही. तर सर्व अर्थसंकल्प हा डीजीटल सोफ्ट कॉपी मध्ये सादर केला जाणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी जवळपास १५ दिवस अर्थमंत्रालयाचे १०० कर्मचारी अत्यंत गोपनीय पद्धतीने अर्थमंत्रालयाच्या प्रेस मध्ये या प्रती तयार केल्या जातात.

यावेळी कोरोना काळात अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना देखील दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेची होत असलेली पडझड लक्षात घेता यंदाचा अर्थसंकल्प यावर काय उपाययोजना आणणारा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या