पेपरफुटी प्रकरण: दोन शिक्षक आणि एका क्लासचालकाला अटक

cbse dession

नवी दिल्ली: सीबीएसई दहावी व बारावीचे पेपर लिक झाल्यामुळे विद्यार्थांचे भविष्य टांगली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपींची चौकशी करुन दोन शिक्षक आणि एका क्लासचालकाला अटक केली आहे. सदर प्रकारात शिक्षकच सामील असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी देलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून क्लासचालकाला पाठवले. त्यानंतर क्लासचालकाने ते विद्यार्थ्यांना पाठवले. पेपरच्या फोटोसह हाताने लिहलेल्या प्रश्नांचा फोटोदेखील व्हायरल होत होता. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख जाहीर केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव (शालेय शिक्षण) अनिल स्वरूप यांनी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकदा २५ एप्रिलला होणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, दहावीच्या गणित विषयाबाबत केलेल्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून १५ दिवसांत फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगत फेरपरीक्षा झाल्यास ती फक्त दिल्ली आणि हरयाणामध्येच होईल आणि ती जुलैमध्ये घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.