fbpx

सिडनी कसोटीत ‘पंतगिरी’,विक्रमांचा पाऊस पाडत ऋषभने टाकले धोनीलाही मागे

टीम महाराष्ट्र देशा – भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांचा घोषित केला आहे. चौथ्या कसोटीत चेतेश्वर पुजारानं सर्वाधिक चेंडू खेळण्याचा ९० वर्षे जुना विक्रम मोडल्यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंत यानं शतक झळकावून एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणारा ऋषभ हा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

रिषभ पंतने केले हे नवीन विक्रम

  • रिषभ पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक केले आहे. त्याने हे शतक 137 चेंडूत पूर्ण केले. त्याने त्याचे पहिले शतक इंग्लंडमध्ये द ओव्हल मैदानावर केले होते.
  • ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या एकाही यष्टीरक्षकाला आतापर्यंत शतक झळकावता आले नव्हते.अगदी धोनीलाही आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावता आले नव्हते.
  • सिडनी कसोटीत १५९ धावा करणारा ऋषभ भारताबाहेर सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक ठरला आहे. यापूर्वी धोनीनं २००६ साली फैसलाबाद कसोटीत पाकिस्तानच्या विरुद्ध १४८ धावांची खेळी केली होती.
  • ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक ठोकणारा पंत हा दुसरा सर्वाधिक तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. तो २१ वर्षांचा आहे. यापूर्वी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं १८ व्या वर्षी दोन शतकं ठोकली होती.