जुने प्रकरण काढून राजकारण करायचे पंकजाने बंद करावे – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा – बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी शिवाजीराव पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर टीका केली असून पंकजांना जिल्ह्यात अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागत आहे. बीडमधील जनता भाजपच्या पालकमंत्र्याविरोधात रस्त्यावर उतरुन आक्रोश व्यक्त करत आहे. त्यामुळे एखादं जुने प्रकरण काढून पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करायचा हे राजकारण बंद करावे, असा इशारा धनंजय मुंडेंनी यावेळी दिला.