ज्यांनी साहेबांना आयुष्यभर धोका दिला तेच आता म्हणतात साहेबांचा अपमान होतोय-पंकजा मुंडे

नाव न घेता पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेवर आणि अजित पवारांवर हल्लाबोल

पुणे : ज्या शत्रूने स्व. गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर धोका दिला. तेच आता म्हणतात भारतीय जनता पार्टीने साहेबांवर अन्याय केला. साहेबांच्या नावाने महामंडळ झाल पाहिजे, साहेबांच्या नावाचा गौरव झाला पाहिजे अस म्हणणे म्हणजे ही सगळी मुंडे साहेबांना मानणारा वर्गाला आपलस करण्यासाठी धडपड आहे. अस म्हणत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नाव न घेता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड येथे आजोजित केलेल्या आठवणीतील गोपीनाथ मुंडे या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रसच्या हल्लाबोल मोर्चादरम्यान परळी येथे झालेल्या सभेत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी भाजप गोपीनाथ मुंडे यांच्यावर अन्याय करत असल्याची टीका केली होती तर गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरु केलेल्या उसतोड महामंडळाच काय झाल असा सवाल सुद्धा या सभेत त्यांनी केला होता.

या सभेदरम्यान पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर टीका करताना वारंवार शत्रू हा शब्द वापरल्याने दोघा भावा-बहिणीमध्ये असणारी ही लढाई अजूनच तीव्र झाली आहे. आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी खास आपल्या शैलीत शायरी सादर करत विरोधकांवर टीका केली

काय म्हणाल्या पंकजा मुंडे

मेरे दुश्मन भी मेरे मुरीद है शायद,
वक़्त बेवक्त मेरा नाम लिया करते है।
मेरी गली से गुज़रते हैं छुपा के खंजर,
रु-ब-रु होने पर सलाम किया करते हैं

पहा पंकजा मुंडेंच संपूर्ण भाषण 

You might also like
Comments
Loading...