आमदारकीचं स्वप्न भंगलेल्या पंकजा मुंडेंचा आज विधीमंडळात दिसला पुन्हा तोचं वट

blank

टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर भारतीय जनता पक्षाला १०५ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. परंतु अजूनही सत्ता कोण स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

या निवडणुकीत भाजपच्या बड्या मंत्र्यांचा पराभव झाला आहे. भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांचाही यात समावेश आहे. परळीमधून धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. पराभवानंतर त्यांना आता विधानपरिषदेवर घेऊन मंत्रिपद देण्यात येणार असल्याच बोलले जात आहे. त्यामुळे भाजप नेमका काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पंकजा मुंडेंचा पराभव झाला असला तरी त्यांनी आज भाजपच्या गटनेता निवडीच्या बैठकीला हजेरी लावली. तसेच त्यांनी अनेक नेत्यांची भेट घेतली. त्यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडेंनी नितेश राणे यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले म्हणून पंकजा यांचे मंत्रीमंडळातील स्थान निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपच्या मंत्र्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. त्यात पंकजा मुंडे, राम शिंदे, बाळा भेगडे, अनिल बोंडे परिणय फुके यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांच्या भविष्याविषयी पक्ष नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या