शेतकऱ्यांसाठी पंकजा मुंडे सरकारविरोधात आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा – देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी झालेल्या पावसाने खरिपांचे तोंडाशी आलेले पिक गेले आहे.

याविषयी पंकजा मुंडे यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी सरसकट अतिवृष्टीची नुकसानभरपाई द्यावी. लोकांच्या रांगा आणि अस्वस्थता शांत करण्यासाठी आश्वस्त करणारे शब्द आवश्यक आहेत. अधिकारी आणि बँक यांना कडक सूचना आवश्यक आहेत. अशा शब्दात सरकारला आवाहन केले आहे.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची नोंद घेण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र परतीच्या पावसाने झालेले अतोनात नुकसान शेतकरी वर्गाला अस्वस्थ करणारे आहे. सातत्याने दुष्काळी परिस्थिती आणि आता यावर्षी ओला दुष्काळ अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल आहे.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यात अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत राज्य मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना 10 हजार कोटींच्या तात्काळ मदतीचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या