पंकजाताईला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचं स्वप्न पूर्ण होणार – प्रीतम मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : “येणारा काल निश्चितच संघर्षाचा आणी परिश्रमाचा आहे, जिद्द मेहनत म्हतवाची आहे , पंकजाताईला मुख्यमंत्री म्हणून पाहणे हे तुम्ही जे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण होईल त्या साठी एकत्र वाटचाल करणे गरजेचे आहे” असे उद्गार खासदार प्रीतम मुंडे यांनी बीड मध्ये काढले. बीड मध्ये भाजपाच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

प्रीतम मुंडे पुढे म्हणाल्या की, “बीड जिल्ह्यासाठी भावी काळ सुवर्ण अक्षराने लिहिणारा असणार आहे.” एका पदाधिकाऱ्याच्या भाषणाचा धागा पकडून त्या म्हणाल्या, “ते आणि समोर बसलेले तुम्ही सर्व जण पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री होतील हे स्वप्न पाहत आहात, भविष्य संघर्षाचे आहे, खडतर रस्ता आहे पण जिद्द मेहनत महत्त्वावाची आहे, एकत्र येऊन वाटचाल करावी लागणार आहे, आज मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडायला आले नाही किंवा शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आले नाही. मात्र गर्दी वाढली आहे भाजपाची ताकद वाढत आहे, जिल्ह्यातील पाच आमदार, बॅँक, जिल्हापारिषद ताब्यात आहे” असे ही त्या म्हणाल्या, तत्पूर्वी बोलतांना त्यांनी रमेश अडकरांना संघर्ष करावा लागला, त्यांनी यश मिळवण्यासाठी आपल्या नावात हिंदी चित्रपटाप्रमाणे थोडा बदल करून बघावा असा सल्ला दिला तेव्हा एकच हशा पिकला.

IMP