जरा मुडके देखो जनता किसके साथ है – पंकजा मुंडे

सावरगाव : भगवानगडावर होणारा दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर पंकजा मुंडे यांनी भगवान बाबा यांच्या जन्मगावी अर्थात सावरगाव (घाट) येथे आज दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली होती. आपल्या भाषणात पंकजा काय बोलणार याकडे सगळ्या राज्यच लक्ष लागल होत.

जरा मुडके देखो जनता किसके साथ है , अस म्हणत पंकजा मुंडे यांनी आलेल्या समुदायाला संबोधित करण्यास सुरवात करत सावरगावात भगवानबाबांची मोठी मूर्ती उभारणार असून भगवानबाबांच्या जन्मभूमीचा विकास करणार असल्याच जाहीर केल. त्याचबरोबर महंतांनी असा निर्णय का घेतला मला माहिती नाही अस म्हणत भगवान गडाचे महंत नामदेव शास्री यांच्यावर बोलण मात्र टाळले.

नव नेतृत्व मी हाताला धरून पुढे करील 

पंकजा मुंडे जनतेसोबत आहे. ज्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा व्यक्ती जर भेटला तर मी त्याचा हात धरून पुढे करेल आणि मी मागे होईल अशी भावनिक सादही यावेळी पंकजा मुंडे यांनी घातली.कर्मभूमीनं नाकारलं तरी भगवानबाबांच्या जन्मभूमीनं आम्हाला बोलावलं. भगवानगडावर दर्शन झालं नाही पण जन्मभूमीत आम्हाला भगवानबाबा आता आम्हाला सावरगावात दिसताय. या मेळाव्यातून आम्ही सावरगावात आता भगवानबाबा दिसताय हा निर्णय आम्ही जनमानसातून घेतला अशी जनता कुणासोबत आहे हे एकदा पाहुन घ्या अस सुद्धा पंकजा मुंडे म्हणाल्या

You might also like
Comments
Loading...