fbpx

पंकजांंनी माझे काम कधी अडवले नाही- राजेश टोपे

अंबड:- विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील दिग्गजांची भाजपत जाण्यासाठी रांग लागली आहे. यात मराठवाड्यातून अनेक जणांनी भाजप शिवसेने मध्ये प्रवेश केला आहे. तर काही नेते वाटेवर आहेत. अशातच भाजपतील बालविकासमंत्री पंकजा मुंडेवर राष्ट्रवादीचे घनसावंगी विधानसभ मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे यांनी स्तृतीसुमने उधळली आहे. पंकजां मुंडेकडे काम घेऊन गेल्यावर त्यांनी कधीच अडवले नसल्याचे सांगत राजेश टोपे यांनी पंकज मुंडे यांची प्रशंसा केली. यामूळे अंबड आणि जालन्यात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहेत.

अंबड येथील एका कार्यक्रमात टोपे बोलत होते. टोपे म्हणाले, पंकजा मुंडे यांनी माझ्या मतदारसंघात त्यांच्या खात्यातून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे .मी आजपर्यंत जे काम त्यांच्याकडे घेऊन गेलो ते कधीच अडले नाही. पंकजा या माझ्या भगिनी असल्याचा उल्लेखही राजेश टोपे यांनी केला .विरोधी पक्षात असलेले टोपे हे सत्ताधारी पक्षात मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंचे गुणगान गात असल्याचे पाहून काही वेळेसाठी उपस्थित गावकरी सुद्धा आश्‍चर्यचकित झाले होते.

विधानसभा निवडणुका तोंडावर आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नसताना दिसत आहेत . सार्वजनिक कार्यक्रमात विरोधीपक्षात असलेल्या टोपेनी सत्ताधारी मंत्र्यांचे कामाचे गोडवे गायले. यामूळे राजकीय चर्चेला मात्र उधाण आले आहे.