जानकरांच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे म्हणतात…

पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज पुण्यात आयोजित करण्यात आला होता. सेना-भाजपा युतीवर जागावाटपात दुर्लक्ष केल्याने त्यांनी आज नाराजी व्यक्त केली होती. पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांच बहिण-भावाचं नात सगळ्यांना माहित आहे. परंतु नाराज असलेल्या जानकरांनी, ‘बहीण–बहीण म्हणून मी जवळ गेलो पण कोणीही माझी जबाबदारी घेतली नाही’ असे म्हणत जाणकरांनी महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती.

या वक्तव्याबद्दल पंकजा मुंडेंना विचारले असता त्या म्हणाल्या,  ‘ते काय बोलले हे मला माहित नाही, त्यामुळे मी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे भाष्य करणार नाही’ भाजपनं दुर्लक्ष केल्यावर पंकजा मुंडे त्यांना आपलसं करतील अशी जानकरांना अपेक्षा होती. परंतु पंकजा मुंडेंनीही त्यांच्यावर दुर्लक्ष केल्याने त्यांनी भाजपसह पंकजा मुंडेंवर टीका केली होती.Loading…
Loading...