#महापूर : महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पंकजा मुंडेची सॅनिटरी नॅपकिन्सची मदत

blank

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर – सांगली येथे आलेल्या महापुरामुळे दोन्ही जिल्ह्यात हलाकीची परिस्थिती आहे. अनेक नागरिक अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांसाठी संपूर्ण राज्यातून मदत केली जात आहे. तर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ग्रामिण विकास मंत्रालय ‘उमेद’ तर्फे सॅनिटरी नॅपकिन्सची पॅकेट्स उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे.

पूरग्रस्त भागात महिलांचं आरोग्य निरोगी रहावं, मासिक पाळीच्या काळात त्यांची अडचण होऊ नये यासाठी ‘उमेद’कडून ही मदत केली जाणार आहे. सांगली-कोल्हापूर भागात सध्या पुरामुळे लोकांची घरं वाहून गेली आहेत. त्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू, अन्न-धान्य पुरवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत.सरकारी यंत्रणा आपल्या परीने काम करीत आहे. तिथे जाऊन त्यांच्या कामात अडथळा आणू नका. आपआपल्या परीने संवेदन राहून परिस्थिती पुर्ववत करण्यासाठी मदत करूयात, असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान कोल्हापूर सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापूर आला आहे. हा महापूर अजूनही कायम आहे. काही भागातले पाणी ओसरले आहे. मात्र काही भागात अजूनही घरं पाण्याखाली आहेत. त्यामूळे नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक नागरिक कॅम्पमध्ये आश्रयाला आले आहेत. या नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन कार्यरत आहे. तर सेवाभावी संस्थांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे.

महत्वाच्या बातम्या