पंकजा मुंडेंच्या अडचणीत वाढ, अन्न आणि औषध प्रशासनाची नोटीस

pankaja-munde

बीड: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना अडचणीत आला आहे. यापूर्वी पंकजा मुंडेंच्या परळीमध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलयुक्त शिवार घोटाळा उघडीस आला होता. अन्न आणि औषध प्रशासनाने वैद्यनाथ साखर कारखान्याला नोटीस बजावली आहे. ८ डिसेंबरला वैद्यनाथ कारखान्यात स्फोट होऊन ७ जणांचा मृत्यू झाला होता.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात रसाच्या टाकीचा स्फोट झाल्यानंतर आता त्याची कारणं समोर आली आहेत. ८ डिसेंबरला वैद्यनाथ कारखान्यात स्फोट होऊन ७ जणांचा मृत्यू झाला होता. येत्या दहा दिवसात यात सुधारणा झाली नाही, तर कारखान्याचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं यासंदर्भात कारखान्याला नोटीस बजावली आहे.

यापूर्वी कारखान्यानं त्रुटींची पूर्तात करणं आवश्यक होतं. मात्र १५ मार्चाला अन्न विभाग आणि राज्य गुप्तवार्ता विभागान काखान्याची पाहणी केली. तेव्हा अनेक त्रुटी आढलल्या. त्यानंतर ही नोटीस बजाविण्यात आली.