मुंबई- भगवान भक्तीगड सावरगाव या ठिकाणी ऑनलाईन दसरा मेळावा घेतल्याप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे गोत्यात आल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या विरोधात अमळनेर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास ४० ते ५०जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयादशमीच्या मुहुर्तावर (रविवार 25 ऑक्टोबर) सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन घेण्याचं योजण्यात आलं होतं, मात्र तरीही पंकजा मुंडेंच्या अनेक समर्थकांनी यावेळी गर्दी केली. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला. त्यानंतर भगवान गडावर पूजा-अर्चना केली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतंही सोशल डिस्टन्स पाळलं नाही. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही असही स्पष्ट दिसतं असल्याच समोर आल्याने मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरुड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आदी लोकांचा समावेश आहे.
अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 26, 2020
‘अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..’ अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- लग्न संस्थेवर विश्वास नाही, लग्नासाठी सीमा असू नयेत – राधिका आपटे
- पोलंड मधील व्रोकला शहरात आता ‘हरिवंश राय बच्चन’ चौक !
- एलआयसीची प्रारंभिक भाग विक्री पुढील आर्थिक वर्षात
- ‘माझी प्रकृती उत्तम आहे,थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन’
- पुणेकरांसाठी खुशखबर ! १ नोव्हेंबरपासून खुली होणार शहरातील उद्याने !