‘लेकीला आज्ञा द्या बाबा’ भावनीक साद घालत पंकजा दसरा मेळाव्यासाठी रवाना

वेबटीम : ‘लेकीला आज्ञा द्या बाबा, दसरा तुमचा विचारही तुमचेच, आम्हीही तुमचे, स्थळ मात्र आता तुमची पावन जन्मभूमी… सावरगाव येथे येत आहे सीमोल्लंघन करण्यासाठी दसरा मेळाव्यासाठी’ अशी भावनिक साद घालत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगावकडे प्रस्थान केले आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांची ‘माहेरच्या लेकीला भगवान गडावर वीस मिनिटे द्या’ ही विनंती फेटाळली.

त्यानंतर वर्षानुवर्षापासून सुरु असलेल्या परंपरा मोडत पंकजा मुंडे यांनी भगवान बाबाचे जन्मस्थान असलेल्या पाटोदा तालुक्‍यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या वादावर पडदा पडला. अखेर आज दसरा मेळावा भगवान बाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगांव घाट ता. पाटोदा येथे होणार आहे. पंकजा मुंडे यांच्या या भाषणाकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागल आहे.