Share

Pankaja Munde | “मी कोणासमोर झुकणार नाही, आता…”, पंकजा मुंडेचा एल्गार

मुंबई : सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले आहे. यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच या दसरा मेळाव्यावरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप, टोलेबाजी करण्याची चढाओढ लागली असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच भाजप (BJP) पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी दसरा मेळाव्याव्यात एक वक्तव्य केलं आहे.

मी संघर्षाला घाबरत नाही. छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि भगवानबाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख, असं पंकजा मुंडे म्हणाल्या, मी थकणार नाही, रुकणार नाही आणि कधीही कोणासमोर झुकणार नाही असेही त्या म्हणाल्या. छत्रपती संभाजीराजेंचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यामुळं मी संघर्ष करत राहणार असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी आता कोणताही अपेक्षा करणार नाही. मी आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

४० वर्षाच्या राजकारणात केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली हा संघर्ष कमी आहे का? गोपीनाथ मुंडे यांचा हा संघर्ष आपल्यासमोर असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणाऱ्या शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचे रक्त आहे. मी थकणार नाही आणि कधीही कुणासमोर झुकणार नाही असं त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. मला स्वाभिमान आहे. माझ्या लेखी नाराजीचा विषय संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील आपण 2024 च्या तयारीला लागायचं असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

दरवर्षी राज्यात दोन दसरा मेळावा असायचे. त्यातील एक मी दुपारी घ्यायचे, तर दुसरा मुंबईमध्ये व्हायचा. यावर्षी आणखी एक मेळावा होत आहे, एकनाथ शिंदे यांचा असं म्हणत मी सर्वांना शुभेच्छा देते, तसेच या सर्व मेळाव्यातून जनतेचे, वंचितांचे, पीडितांचे, विषय प्राधान्याने घेतले जातील, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले आहे. यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now