पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावर होणार; कार्यकर्त्यांना केले ‘हे’ आवाहन

pankja munde

बीड : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर होणार आहे. या मेळाव्यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत. तसेच सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आव्हान देखील त्यांनी या व्हिडीओद्वारे केले आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागच्यावर्षी पहिल्यांदाच आपला दसरा मेळावा प्रत्यक्ष नाही तर तो ऑनलाईन स्वरुपात झाला. गेल्या दोन वर्षामध्ये खूप गोष्टी मनामध्ये साचलेल्या आहेत. त्याशिवाय तुमचेही ऐकायचे आहे आणि मला पण बोलायचे आहे. आतापर्यंत आपण अनेक संकल्प केले आहेत.मुंडे साहेबांनी अनेक संकल्प केले होते आपण ते तडीसही नेले. असेच संकल्प करण्यासाठी आपण दरवर्षी तिथं येतो.

ती एक उर्जा आहे, एक शक्ति आहे, आपला अभिमान आहे स्वाभिमान आहे. आपण तिथे खूप मोठ्या संख्येने याल अशी अपेक्षा आणि मला तुमच्याशी खूप काही बोलायचे आहे. मी काही सूचना केल्या आहेत त्या नम्र सूचनांच आपण आपण पालन विनंती असेही पंकजा मुंडे यांनी सांगितल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या