‘पंकजा मुंडेंच्या बँकेत जमा झाला काळा पैसा’

टीम महाराष्ट्र देशा – भाजपाध्यक्ष अमित शहा आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या बँकात नोटाबंदीनंतर काळा पैसा जमा झाला आहे. सीबीआय, रॉ आणि न्यायालयासह अनेक संस्था पपेट झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर या संस्था नाचत असल्याचा आरोप माजी क्रिकेटर आणि काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी केला आहे.

पुणे येथे भारती अभिमत विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी नवज्योत सिंह सिद्धू म्हणले की, हजारो लोक नोटाबंदीमुळे बेरोजगार झाले आहेत. रोख रक्कमेवर देशाची अर्थव्यवस्था आज अवलंबून आहे. देशामध्ये 93 टक्के लोक कॅशने व्यवहार करत आहेत. कॅशलेस हा तुघलकी निर्णय आहे.

काळा पैसा हा देशात लपवून ठेवल्याचे सरकार म्हणत होते. पण काळा पैसा हा परदेशात सोनं, स्थावर मालमत्तामध्ये असून हा पैसा देशात आला नाही. सीबीआय कारवाई, नोटाबंदी, बेरोजगारी आणि काळ्या पैशावरुन नवज्योत सिंह सिद्धू यांनी सरकारवर टीका केली.

नोटाबंदी नंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या बँकेत साडेसातशे कोटी पाच दिवसात जमा झाले. तर महाराष्ट्रात जयंतीभाई आणि पंकजा मुंडे यांच्या बँकांत पैसा जमा झाल्याचा आरोप सिद्धू यांनी यावेळी केला आहे.