मला गडावर मेळावा घेऊ द्या पंकजा मुंडे यांचे नामदेव शास्री यांना भावनिक पत्र

मुंबई : भगवान गडावर दसरा मेळावा होणार की नाही याकडे सगळ्या राज्यचे लक्ष लागले असतना पंकजा मुंडेंनी आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्री यांना भावनिक पत्र लिहून ‘गडावर मेळाव्यासाठी फक्त 20 मिनिटांची परवानगी द्या’ असे आवाहन केले आहे आहे.

मी आपल्यापेक्षा लहान आहे आणि गडाची लेक म्हणून पत्र लिहित आहे. या लोकांमुळेच मी आणि तुम्ही आहोत त्यामुळे या पत्रातून लोकांच्या भावनांचा विचार करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

वाचा पंकजा मुंडे याचं पत्र आहे तस

आदरणीय मठाधिपती न्यायचार्य डॉ.नामदेव शास्री
श्री क्षेत्र भगवान गड
तस आपल्यात काय झाल या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडेही नाही पण आज आपल्याकडे आपली लेक एक पहिली आणि शेवटची विनंती करत आहे.आणि लोकांची तळमळ बघून मी ठरवल, कोणी मध्ये नको मीच विनंती करते,शेवटी मी लहानच आहे. वाराणीच्या गहिनीनाथ गडाच्या सप्ताहात सामोरोपाच्या तस म्हणाले होते  “मी लहान होते तुम्ही मोठे व्हा ” कृपया त्या असंख्य लेकरांकडे बघा ! काही नको त्यांना २० मिनिट वेळ वर्षातून द्या… ते गरीब कोयता घेऊन जातील राबायला आणि मी ही परत येणार नाही… त्यांना काय मिळत ? तर त्यांच्या फाटक्या कुडात राहण्याची उर्जा मिळते, उन्हातान्हात राबायची ताकद मिळते, वेदनेत हसण्याची शक्ती मिळते, त्यांच्या किडकिडीत छातीत अभिमान भरून नेतात, उर भरून अभिमान घेऊन जातात… कट्या कुपाट्यात, उन्हातान्हात राबतात, कोणी उसाच्या फडत तर कोणी रानात कोणी मुंबई सेन्ट्रल वर ४ बॅगा उचलून घेत ३ ऐवजी, कोणी चेंबूर मध्ये रात्रभर टॅक्शी चालवत, कोणी पोलीसवाला राबतो ट्राफिक मध्ये नाक्यावर, कष्ट करता पण हे सर्व भूषनाने अभिमानाने वावरतात तो स्वाभिमान वाढवण आपल्याला जमलं तर कराव पण तो हिरावून घेऊ नये हे नक्की… मी कोणासमोर कधी झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होते तेवढे क्षण दिवाळीची माहेरची भेट म्हणून मला द्या, माझ्यासाठी नाही पण त्या चेहऱ्यासाठी जे उजळले राहावेत म्हणून मी संघर्ष यात्रा काढली. यांच्या डोळ्यात अश्रू असे न का पण जिवंतपणा असू देत यासाठी आपण योगदान दिल पाहिजे… समाज बांधन जमलं नाही तर तो तोडन तरी आपण होऊ देऊ नये… भक्तांना त्रास होऊ नये कोणत्याही माझ्या भावाला इजा होऊ नये त्यांच्या भावना जपण्यासाठी कृपया विचार करून सकारात्मक निर्णय घ्याल ही अपेक्षा. शेवटी तुम्ही आणि मी यांच्यामुळे आहोत व यांच्यासाठी करणं आपलं कर्तव्य आहे.
आपली
पंकजा

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...