मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता जाणवू लागताच पंकजा यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

pankaja munde

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर सत्ताधारी नेत्यांना दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. तर दुसरीकडे विरोधकांना देखील दुष्काळग्रस्त जनतेची खूपच काळजी वाटू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित सिंचन अनुशेष आणि पाण्याची तूट भरून काढण्यासाठी मराठवाड्याला राज्यातील अन्य धरणांतून पाणी देऊन दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.

पत्रात पंकजा यांनी असे नमूद केले आहे की, येत्या दहा वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील सिंचन सरासरी बरोबर येण्यास, मराठवाड्याला १५०.१८५ टीएमसी पाणी इतर खोऱ्यातून स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. कोकण विभागातील दमणगंगा, नारपार, पिंजाळ व वैतरणा खोºयात २६४ टीएमसी पाणी उपलब्ध असून त्यातून ११५ टीएमसी पाणी अप्पर वैतरणा धरणामार्फत गोदावरी खोºयात स्थलांतरीत करता येते. जायकवाडी धरण, वॉटर ग्रीडसाठी ३५ टीएमसी पाणी वापरून ८० टीएमसी पाणी औरंगाबाद, जालना, बीड आदी जिल्हयात वापरता येईल. कृष्णा खोºयातील ५८५ टीएमसी पाणी महाराष्ट्रात वापरण्याची परवानगी लवाद क्रमांक १ नुसार शासनास मिळाली आहे. मराठवाड्याचा ८.४ टक्के भाग कृष्णा खो-यात येत असल्यामुळे उस्मानाबाद व बीड जिल्हयात ४९.१ टीएमसी पाणी वापरण्याचा हक्क मराठवाडयाला पोहचतो परंतु, आजपर्यंत फक्त २५.४ टीएमसी पाणी मिळाले असून २३.७ टीएमसी पाणी मिळणे बाकी आहे. यावरुन कृष्णा मराठवाडा प्रकल्पास (केएमपी) लागणारे मुळे नियोजनानुसार २३.६६ टीएमसी पाणी (७ टीएमसी ऐवजी) वापरून कृष्णा मराठवाडा प्रकल्प लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे आवश्यक आहे.

तसेच १९८० च्या लवादानुसार गोदावरी खो-यातून पोलावरम प्रकल्पाकरीता कृष्णा खोऱ्यात ८० टीएमसी पाणी देताना महाराष्ट्राच्या वाट्याचे १४ टीएमसी आणि कर्नाटकाचे २१ टीएमसी असे एकूण ३५ टीएमसी पाणी देण्याची तरतूद गोदावरी लवादात आहे. शिवाय हे पाणी नागार्जुन सागर धरणाच्या वरील भागातून महाराष्ट्राने परत घ्यावयाचे आहे, त्यामुळे लवाद तरतुदीनुसार हे १४ टीएमसी पाणी कृष्णा खोाºयातून गोदावरी खोाºयात लातूर, बीड, उस्मानाबाद या अवर्षण प्रवण जिल्हयात मिळणे आवश्यक आहे. हे पाणी कृष्णा खोाºयात वापरण्याचे त्यांना हक्क पोहचत नाही. मराठवाड्यातील काही पूर्व भागास विदभार्तून पाणी स्थलांतरीत करणे सोईचे आहे. त्यामुळे विपुल पाणी असणाºया वर्धा, वैणगंगा, इंद्रावती इत्यादी उप खोत्यातून अंदाजे ३० टीएमसी पाणी मराठवाड्यास मिळणे आवश्यक आहे. हे पाणी नांदेड जिल्हयातील अप्पर पैनगंगा धरणात व परभणी जिल्हयातील येलदरी धरणात स्थलांतरीत करता येते. कारण ह्या धरणांच्या वरील बाजूस विदर्भात बरीच धरणे बांधल्यामुळे या धरणात सध्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नाही. त्यामुळे विदभार्तील पाणी या धरणांसाठी वापरणे सयुक्तीक ठरेल असे देखील पत्रात नमूद करण्यात आले आहे.