आज पुन्हा एकदा रंगणार मुंडे-पवार यांच्यात जोरदार ‘वाकयुद्ध’

शरद पवार बीड मध्ये तर पंकजा मुंडें खरवंडीत घेणार मेळावा

टीम महाराष्ट्र देशा- भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या खरवंडी कासार येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत आज दुपारी एक वाजता ऊसतोडणी कामगार व मुकादमांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नांबाबत गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांच्यावर ऍड. प्रताप ढाकणे यांनी केलेली टीका आणि भगवानगडावरचा दसरा मेळावा रद्द झाल्यानंतरचा पायथ्याशी होणारा राजकीय मेळावा हा मुंडे भगिनींसाठी महत्त्वाचा असून त्या त्यातून काय संदेश देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

तर दुसऱ्या बाजूला राज्यात आणि केंद्रातील जनता विरोधी सरकार उलथवून टाकण्यासाठी बीडच्या भूमीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब हे सोमवारी विजयी संकल्प सभेच्या माध्यमातून रणशिंग फुंकणार आहेत. बीडच्या नगरीतील ही ऐतिहासिक सभा न भूतो न भविष्यती व्हावी, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

धनंजय मुंडेंच्या गणेशोत्सवात सपना चौधरीचे ठुमके

आरक्षणाची फाईल म्हणजे चिक्कीची फाईल नाही; प्रकाश आंबेडकरांनी उडवली पंकजा मुंडेंची खिल्ली