दुष्काळ निवारणासाठी पंकजा मुंडेंच एक पाऊल पुढे, ग्रामस्थांसोबत केले श्रमदान

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दुष्काळ दौरे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

Loading...

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे सध्या जिल्ह्याचा दुष्काळ दौरा करत आहेत. दुष्काळ दौऱ्यानिमित्त चारा छावण्यांना भेट आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याबरोबरच पंकजा मुंडे यांनी बीड तालुक्यातील तळेगाव येथे श्रमदान केलं. संध्याकाळी हिंगणी बु येथे वॉटरकप स्पर्धेतील गावात जाऊन ग्रामस्थांसोबत श्रमदान केलं. ही दोन्ही गावे पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत उतरली आहेत. या दोन्ही ठिकाणी ग्रामस्थ एकजुटीने दुष्काळ निवारणासाठी श्रमदान करत आहेत. पंकजा मुंडेंनीही या कामाला हातभार लावला.

दरम्यान, दुष्काळाचा सामना करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांवर काम करत असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं. मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ येतो. हा जिल्हा सर्वाधिक विमा मिळविणारा जिल्हा असला तरी ही बाब आनंदाची नाही. सध्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जादा टँकर देणे हाच पर्याय आहे, असं मत मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले.Loading…


Loading…

Loading...