तर माझ्या मंत्रीपदाला काहीही अर्थ उरणार नाही: पंकजा मुंडे

औरंगाबाद: बचत करणे ही महिलेची ताकत असून ती कोणाच्याही उपकारात राहत नाही. महिलांचा स्वाभिमान टिकून राहावा यासाठी घरकुलाला महिलांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे महिला बचत गटांच्या मेळाव्यात व्यक्त केले.

मंत्रिमंडळातील पहिल्या पाच मंत्र्यात माझा समावेश असून जर मी महिलांच्या अस्मितेसाठी, आरोग्यासाठी काहीही केले नाही तर माझ्या मंत्रीपदाला काहीही अर्थ उरणार नाही. माझी अस्मिता या योजनेअंतर्गत देण्यात येणारे सॅनिटरी नॅपकिन बचत गटाच्या माध्यमातून देण्यात येणार असून बचत गट सक्षम करण्यासाठी शून्य टक्के दराने कर्ज देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

बेटी बचाओ, बेटी पढाओ, माझी अस्मिता, जलयुक्त शिवार, स्वच्छता मोहीम आशा जनतेच्या मनातल्या योजना भाजपा सरकारच्या काळात सुरू झाल्या आहेत. बचतगटाची तीन वर्षात ४० ते ५० प्रदर्शने झाली असून बचत गटाच्या उत्पादनाचा दर्जा सुधारला आहे. राज्यात आता प्लास्टिक बंदी केल्यामुळे कापडी पिशव्या तयार करायचे काम महिला बचत गटांना देण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

You might also like
Comments
Loading...