पंकजा मुंडे यांनी परळीत ‘गाव तिथे विकास’ दौऱ्याला केली सुरुवात

बीड: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यात ‘गाव तिथे विकास’ दौऱ्याला आजपासून सुरुवात केली आहे. या दौऱ्याला खोडवा सावरगाव येथून प्रारंभ झाला. गावोगावी जाऊन पंकजा मुंडे जनतेशी संवाद साधत आहेत. दरम्यान पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत परळी तालुक्यातून भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नसल्यामुळे खंत व्यक्त केली.

परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंसमोर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आतापासून तयारीला लागल्या आहेत. पंकजा मुंडे म्हणाल्या, परळीत भावना आणि विश्वासाच्या जोरावरच निवडणूक लढवता येऊ शकते, असं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे नेहेमीच सांगायचे. दारू, पैसा आणि गुंडागर्दीच्या जोरावर निवडणुका जिंकणं अशक्य आहे.

You might also like
Comments
Loading...