fbpx

…तर मी धनंजयसाठी राजकारणही सोडलं असतं – पंकजा मुंडे

pankaja munde & dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या राजकारणात मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र मुंडे भाऊ बहिणीची माया देखील राज्याने वारंवार पहिली आहे. धनंजय मुंडे यांना मिळालेल्या एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मिठी मारून भावाच अभिनंदन केल होत तर आज पुन्हा होतं ‘न्यूज18 लोकमत’च्या न्यूज रूम चर्चा या कार्यक्रमात पुन्हा एकदा पंकजा मुंडे याचं आपल्या भावाप्रती प्रेम दिसल आहे.

राजकारणात असं एकही घराणं नाही जिथे भांडणं नाहीत. सगळ्याच ठिकाणी कुरबुरी सुरू असतात मात्र फक्त मुंडे कुटुंबाचीच चर्चा जास्त होतं अशी खंत व्यक्त केलीय बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या नात्याबद्दल जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी आपल्य मनातली सल बोलून दाखवली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, आमच्या घराण्याची ताकद मोठी होती. बाबा मंत्री होते. मीही लोकांच्या आग्रहाखातर राजकारणात आले. बाबांनी धनंजयलाही आमदार केलं. एवढं सगळं देऊनही तो राष्ट्रवादीत गेला. तो जर भाजपमध्ये असता तर मी त्याच्यासाठी राजकारणही सोडलं असतं. पण आता आमचे मार्ग वेगळे आहे.अशी खंत त्यांनी व्यक्त केली.