fbpx

युतीच्या उमेदवारांना विजयी कर, पंकजा मुंडे तुळजा भवानी मातेच्या चरणी

टीम महाराष्ट्र देशा- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील भाजपा-सेना उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उस्मानाबाद येथे आले असता काल तुळजापूर येथे जाऊन भवानी मातेचे दर्शन घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी सेना भाजपच्या उमेदवारांना विजयी कर असं साकडं महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भवानी मातेला घातलं आहे .

दरम्यान, बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भाजपा, शिवसेना व महायुतीचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस यांनी आपला उमेदवारी अर्ज काल उस्मानाबाद येथेराज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दाखल केला.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले. “आता भविष्यात कोणाला भाऊ मानणार नाही, रमेश कराड यांनी भाजपा सोडल्यामुळे आपल्याला धक्का बसला अशा भ्रमात जे आहेत, त्यांनाच धस यांच्या उमेदवारीमुळे धक्का बसला आहे” असे त्यांनी स्पष्ट केले.

1 Comment

Click here to post a comment