fbpx

पंकजा मुंडेंना भाजपमधूनच विरोध – प्रकाश महाजन

औरंगाबाद  : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना घराबरोबरच भारतीय जनता पक्षातून विरोध असल्याचा आरोप त्यांचे मामा प्रकाश महाजन यांनी केला आहे. पंकजाने दसरा मेळाव्याला प्रचंड मोठी सभा घेऊन भाजपला उत्तर दिलं आहे असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

भगवान गडावर पंकजांना दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केला होता. शासनानेही या मेळाव्याला परवानगी नाकारली त्याचा संदर्भ देत महाजन म्हणाले की, सत्तेत असलेल्या कॅबिनेट मंत्र्याच्या सभेला प्रशासन परवानगी नाकारतेच कसे? लोकांना सर्व समजते असे ते म्हणाले.

पंकजा सध्या घर आणि पक्ष अशा दोन्ही पातळीवर संघर्ष करत आहेत. प्रत्येकाला अशी परीक्षा पास व्हावीच लागते आणि दसरा मेळाव्यानंतर पंकजा ही परीक्षा मेरिटने पास झाली आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे नेता व्हायचा असेल तर याला तोंड दिलेच पाहिजे, असंही त्यांनी सांगितले. पंकजांना ओबीसी मंत्रालय मिळावे अशी लोकांची भावना होती. त्यांनी या पदाला चांगला न्याय दिला असता, असे लोकांना वाटत होते. पण त्यांना हे खाते देण्यात आले नाही. त्यामुळे लोक नाराज आहेत. अर्थात कुणाला कोणते मंत्रीपद द्यावे हा पक्षाचा निर्णय असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.