‘… मंचावर उपस्थित भावी आमदार सुरेश धस’

टीम महाराष्ट्र देशा- आज गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे या भाषणाला सुरुवात करताना उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी सुरेश धस याचं स्वागत करताना भावी आमदार सुरेश धस असं म्हणत स्वागत केलं. पंकजा मुंडे यांनी केलेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागतानंतर धस यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. प्रेक्षकांनी देखील धस यांच्या या उल्लेखला भरभरून दाद दिली.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ४ थ्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार उदयनराजे भोसले,खासदार संभाजीराजे भोसले,सहकारमंत्री सुभाष देशमुख,सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, यांच्यासह अनेक आमदार खासदार उपस्थित होते.