‘मी पंकजा गोपीनाथ मुंडे धनगर आरक्षण देण्याचं वचन देते, अन्यथा मंत्र्यालयात पाय ठेवणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा- धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नसल्याची सिंहगर्जना ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे . नांदेडमधील माळेगावातील खंडोबाची यात्रेत आयोजित धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या. भाजप पुन्हा सत्ता हस्तगत करणार आहे, मात्र धनगर आरक्षण मिळाल्या शिवाय आपण मंत्रालयाची पायरी चढणार नाही असे वचन यावेळी मुंडे यांनी दिले.

राज्यामध्ये धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून समाजामध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. तसेच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दिलेले आश्वासन न पाळत आपली फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. यामध्येच पंकजा मुंडे यांनी माळेगावमध्ये केलेल्या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

समाजाला आरक्षण देण्यासाठी दिल्लीच काय तर पृथ्वीच्या बाहेर देखील जाण्याची आपली तयारी आहे. तसेच धनगर आरक्षणात कोणी आडकाठी  आणली तर काठी उगारायला आपण मागे पाहणार नाही, असेही त्या म्हणाल्या.