माझ्याशी चर्चाकरूनच रमेश कराडांनी उमेदवारी माघारी घेतली; पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

pankajaa munde vr ramesh karad

टीम महाराष्ट्र देशा: बीड–उस्मानाबाद–लातूरच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस विजयी झाले आहेत. भाजपकडे मतांची बेरीज कमी असतांना देखील कॉंग्रेस – राष्ट्रवादीची मते फोडत धस यांनी हा विजय साकारला आहे. भाजपचा विजय राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि विशेषकरून धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.  धस यांच्या विजयात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या चाणाक्ष खेळीचा मोठा वाटा आहे.

सुरेश धस यांच्या विजयानंतर आता पंकजा मुंडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवारी देण्यात आलेले रमेश कराड यांनी आपल्याशी चर्चाकरून उमेदवारी मागे घेतल्याच त्यांनी सांगितल आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुंडे बोलत होत्या. रमेश कराड यांनी ऐनवेळी उमेदवारी माघार घेतल्याने मतदानाआधीच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. आता हा धक्का म्हणजे पंकजा मुंडे यांचीच खेळी असल्याच समोर आल आहे.

पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी , या निवडणुकीत अपरिपक्वतेच राजकारण करण्यात आल्याच म्हणत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. काल प्रवेश देवून आज रमेश कराड यांना तिकीट दिल, तिकीट दिल्यावर त्यांचा योग्य सन्मान केला गेला नाही. त्यांच्यावर प्रेशर आल्याने त्यांनी माझ्याशी चर्चाकरून उमेदवारी मागे घेतली.  त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादीला अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत कराव लागल. हे सर्व होताना त्यांनी मित्रपक्षालाच विश्वास घेतल नाही हे दिसून आल. राज्यपातळीवर करायच्या राजकारणात ते अयशस्वी ठरल्याच म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.