पंकजा मुंडेंनी ‘ठाकरे’ सरकारकडे केली ‘ही’ मागणी

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे जाऊन मी गोपीनाथ मुंडेंचे स्मारक करु नका, अशी मागणी करणार आहे, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होत्या. यावेळी त्यांनी राजकारणातील अनेक गोष्टींवर भाष्य केले.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘ मी कधीही मुंडे साहेबांचे स्मारक करा अशी मागणी केलेली नाही. एखाद्या रेल्वेला किंवा बिल्डींगला मुंडेंचे नाव द्या असे मी म्हणाले नाही. अनेकजण पुतळे उभे करतात मी त्यांनीही रागवते. साहेबांचे विचार जिवंत ठेवा, असे त्या यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना त्या म्हणाले की, ‘मी माझं स्मारक स्वत: बनवलं आहे ते म्हणजे गोपीनाथ गड. ते एकमेव स्मारक आहे जे मी स्वत: बनवलं आहे, कोणाकडेही न मागता,’ असे मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, देशात अशी एकच मुलगी असेल की जिने वडिलांचे स्मारक स्वत: बनवलं. असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी पक्षनेतृत्वाच्या किंवा पक्षाच्या कोणाच्याही विरोधात बोलले नाही. मी जे बोलले ते फार स्पष्ट बोलले. त्या पोस्टमध्ये मी बंड करणार आहे असे कुठेही नाही आहे. मी पक्ष सोडणार मी बंड करणार या वावड्या कोणी उठवल्या हा तपासण्याचे विषय आहे, असे त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या