शेतक-यांना मोठा दिलासा, पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्ह्याला मिळाले खरीपाचे अनुदान

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्हयासाठी शासनाने ११८ कोटी ३३ लाख ५५ हजार रूपये खरीप हंगामा २०१८ चे अनुदान मंजूर केले आहे. सदर अनुदानाची रक्कम संबंधित शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दरम्यान, अत्यल्प पावसामुळे चिंतीत असलेल्या जिल्हयातील शेतक-यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

खरीप हंगाम २०१८ मध्ये शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ घोषित केला होता. या तालुक्यातील बाधित शेतक-यांना कृषी विषयक मदत वाटपाकरिता शासन निर्णयान्वये निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबाद विभागास एक हजार ७७२ कोटी ७१ लाख रूपये इतकी रक्कम वितरित येऊन ३१ मार्च २०१९ पर्यंत ही रक्कम वाटपही करण्यात आली आहे.आता विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी केलेल्या मागणीनुसार दुष्काळ अनुदान वाटपासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उप समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.

त्यानुसार औरंगाबाद विभागास ३९० कोटी २५ लाख ३४ हजार इतका निधी मंजूर झाला असून बीड जिल्हयासाठी ११८ कोटी ३३ लाख ५५ हजार शंभर रूपये मंजूर झाले आहेत. यासंदर्भातला आदेश महसूल विभागाने आज निर्गमित केला आहे. सदर अनुदानाची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली असून संबंधित शेतक-यांच्या खात्यात वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.Loading…
Loading...