…आणि पंकजा मुंडेना आली वडिलांची आठवण

Gopinath Munde and Pankaja Munde

टीम महाराष्ट्र देशा: महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल फेसबुकवर भावूक पोस्ट शेयर केली. पंकाजाताई मुंडे यांनी (बाबा…) असे कॅप्शन देत स्व. गोपीनाथ मुंडे यांचे काही फोटो शेयर केले. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ कायदा लागू करण्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे पंकजाताई नाराज असल्याचे बोलल्या जात आहे.

विरोधकांच्या अभूतपूर्व गोंधळासमोर अखेर सरकारने गुडघे टेकत अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ कायदा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायदा स्थगित करण्याची घोषणा केली. दरम्यान, अंगणवाडी सेविकांना लावलेला ‘मेस्मा’ कायदा त्वरित रद्द करावा, या मागणीवरुन काल विधानसभेत चांगलाच गदारोळ पहायला मिळाला. मेस्मा कायदा रद्द करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला विरोधकांनीही पाठिंबा दिला होता.महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे या मात्र अंगणवाडी मेस्मा कायद्यावर ठाम होत्या पण आता या कायद्याला स्थगिती देणे म्हणजे विरोधकांच्या दबावाचा विजय मानला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेस्मा’ कायदा स्थगिती संदर्भात घोषणा केली तेव्हा पंकजाताई विधानसभेत गैरहजर होत्या. अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ नको, म्हणून शिवसेना विधानसभेत आक्रमक होती. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लागू करण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला होता. हा विषय मंत्रिमंडळासमोरही आणला नव्हता. त्यामुळे ‘मेस्मा’ बाबत मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्यात मतभेद होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.