fbpx

पंकजा मुंडे यांचे उत्कृष्ट नियोजन अंगणवाडी केंद्राची सर्व माहिती आता स्मार्ट फोनवर

मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेले उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शनामुळे राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये पोषण अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे, केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर प्रत्यक्ष पाहणी अंती ही बाब समोर आली आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महिला बालविकास विभागातर्फे रिअल टाईम माॅनिटिरिंग उपक्रमातंर्गत सध्या राज्यभर पोषण अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राची माहिती काॅमन अप्लिकेशन साॅफ्टवेअर द्वारा अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या स्मार्ट फोनमध्ये भरण्याचे काम सुरू झाले आहे. अंगणवाडी सेविका सदर स्मार्ट मोबाईल फोन सहजपणे हाताळत असल्याने सर्व माहिती ऑनलाईन पध्दतीने भरली जात असल्याने दैनंदिन कामकाज जलदगतीने होत आहे.

रजिस्टर होणार इतिहास जमा

अंगणवाडी सेविकांना चौदा प्रकारची माहिती रजिस्टरवर भरावी लागत असे परंतु आता त्यांच्या हातात स्मार्ट मोबाईल फोन आल्यामुळे ही सर्व माहिती एकाच फोनवर व ती ही ऑनलाईन उपलब्ध असणार आहे, सर्व रेकाॅर्ड ऑनलाईन होणार असल्याने येत्या १५ ऑगस्टपासून रजिस्टर इतिहास जमा होणार आहेत. लाभार्थींची संख्या, आहाराचे वाटप, गरोदर व स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींना देण्यात येणारा आहार, बालकांची उंची आणि वजनाची नोंद आदी चौदा प्रकारची माहिती अगदी सहजपणे पाहता येणार आहे.

देशात महाराष्ट्र नंबर एकवर

पोषण अभियानातंर्गत जनजागृती उपक्रम राज्यात चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असून विविध २५ प्रकारच्या पन्नास लाखांहून अधिक जनजागृती पर कार्यक्रमांचे आयोजन सर्वत्र करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर तशी नोंद झाली आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत या अभियानाची प्रभावीपणे अंमल बजावणी करण्यात महाराष्ट्र नंबर एकवर आहे. यासंदर्भात ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेवून या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला. बैठकीस महिला बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. एम. कुंदन, एकात्मिक बालविकास योजनेच्या आयुक्त इंद्रा मालो, उपायुक्त देवरे, गिरासे, प्रकल्प समन्वयक शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.