कसलीही काळजी करू नका, तुम्ही माझा परिवार आहात ; पंकजा मुंडेंनी घेतली दुर्घटना पीडितांची भेट

टीम महाराष्ट्र देशा: परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यात गरम रसाचा हौद फुटून १५ कामगार भाजल्याची घडली आहे. लातूर येथील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी कर्मचाऱ्यांची ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेतली आहे.

“वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मयत कर्मचाऱ्यांना कारखाना व्यवस्थापन मार्फत तीन लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी दोन लाख रुपये तसेच मुंडे कुटुंबा तर्फे वैयक्तिक प्रत्येकी एक लाख रुपये व कुटुंबातील एक व्यक्तीस कारखान्यात नोकरी देण्याचे जाहीर केले. तसेच जखमी व्यक्तींचा उपचाराचा पूर्ण खर्च उचलणार असून मुंडे कुटुंबातर्फे वैयक्तिक प्रत्येकी एक लाख रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून जखमींना प्रत्येकी पन्नास हजार व वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्या मार्फत प्रत्येकी पंचवीस हजार देण्याचे जाहीर केले.” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केल आहे.

हा फक्त साखर कारखाना नसून आमचं घर आहे.

परळी व परिसरातील शेतकऱ्यांच्या घरी सुबत्ता येण्यासाठी व भागात रोजगार उपलब्धतेसाठी लोकनेते गोपिनाथ मुंडे साहेबांनी कारखान्याची वीट न वीट रचताना आम्ही पाहिलं आहे, हा फक्त साखर कारखाना नसून आमचं घर आहे, ही घटना आमच्या घरी घडली ह्याच दुःख आहे. साहेबांच्या जाण्याचे दुःख डोंगरा एवढं होत त्या दुःखात तुम्ही भगिनी उभ्या राहिल्यात. तेच आम्ही डोळ्यासमोर ठेऊन खंबीरपणे उभ्या राहू अशी प्रतिक्रिया जखमी माधव बाळासाहेब मुंडे यांच्या आईंनी दिली.

मी तुमच्या पाठिशी आहे, कसलीही काळजी करू नका.

आज ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे , खा. डॉ. प्रितमताई मुंडे व कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्रीताई मुंडे यांनी सकाळी लातूर येथील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच चांगल्यात चांगले उपचार देण्याच्या सूचना डॉ. लहाने यांना केल्या. यावेळी जखमींच्या नातेवाईकांची ही त्यांनी भेट घेतली. मी तुमच्या पाठिशी आहे, कसलीही काळजी करू नका, तुम्ही माझा परिवार आहेत अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी जखमींच्या नातेवाईकांना धीर दिला.

You might also like
Comments
Loading...