नाराज पंकजा मुंडेंना फडणवीसांनी दिले जेवणाचे निमंत्रण

टीम महाराष्ट्र देशा– भाजपच्या  नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे त्या भाजपला सोडचिठ्ठी देणार असण्याच्या चर्चांना जोर आला आहे. पंकजा मुंडे या भाजपचा नवा गट तयार करण्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत.  गोपीनाथ गडावर येत्या 12 तारखेला जोरदार शक्तीप्रदर्शन होणार असल्याचंही बोललं जातंय.तसेच महाराष्ट्रात अडगळीत पडलेला मुंडे गट पुन्हा सक्रीय होणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

दरम्यान, पंकजा मुंडे भाजपातून शिवसेनेत जाणार असल्याचही बोलल जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मनधरणीसाठी भाजपाकडून धावपळ सुरू असल्याचेच चित्र आहे. सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सर्व व्यवस्थित असल्याचं सांगितलं होत. पण, २४ तासातच भाजपाचे नेते विनोद तावडे पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.

निवडणुकीतील पराभव मुंडेच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याची चर्चा आहे. सत्ता गेली असताना मुंडेंची नाराजी महाराष्ट्र भाजपला परवडणारी नाही. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोनवरून बोलणे झाले आहे.  फडणवीस यांनी मुंडेंना जेवणासाठी बोलावलं असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.परळी मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे या पक्षापासून बाजूला गेल्या होत्या. सार्वजनिक जीवनात वावरत असताना त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाची नाराजी दिसून येत होती. पण, पराभवाबद्दल त्यांनी फार भाष्य केले नव्हते.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यामुळे त्या भाजपला सोडचिठ्ठी देतील अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चांना पंकजा मुंडे यांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे.पंकजा मुंडे यांनी फेसबुक आणि ट्विटरवरुन कमळाचे चित्र हटवले होते. मात्र त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पुन्हा एकदा कमळ दिसले आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना आता नवे वळण मिळाल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या :

Loading...