fbpx

दसरा मेळाव्याचा नवीन अध्याय आता थेट भगवान बाबांच्या जन्मभूमीतून 

वेबटीम: भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यावरून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि  महंत नामदेव शास्त्री यांच्यात यंदाही मोठा वादंग रंगला आहे. त्यातच आज जिल्हा प्रशासनाने भगवान गडावर मेळावा घेण्यास पंकजांना परवानगी नाकारली. यामुळे आता अखेर भगवान बाबांची जन्मभूमी असणाऱ्या सावरगावमध्येच दसरा मेळावा घेण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर दसरा मेळाव्यातील संघर्ष दिसत अटळ मानला जात होता. मात्र, अशात पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांच्या जन्मभूमीत अर्थात पाटोदा तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी मेळावा घेणार असल्याचे जाहीर केलं आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे. “कर्मभूमी नाही तर जन्मभूमी बोलावतेय भगवान बाबा तुमची,जन्मस्थळाची माती कपाळी लावून नवीन अध्याय सुरू करते.. येतेय सावरगाव येथे दसऱ्यासाठी”.  दरम्यान आता सर्वांच लक्ष असणार आहे ते पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे.