fbpx

पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात ‘गांव तिथे विकास’ झंजावती दौरा

परळी : सत्तेच्या माध्यमातून परळी मतदारसंघाच्या विकासाचा सातत्याने ध्यास घेणा-या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे२५ जानेवारीपासून मतदारसंघात गांव तिथे विकास दौरा करत आहेत. या दौ-याच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागातील मूलभूत विकास योजना जनतेच्या दारापर्यंत घेऊन जाणार आहेत.

२५ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. तपोवन येथील महादेवाचे दर्शन घेऊन पंकजा मुंडे यांनी विकास दौ-याला प्रारंभ करणार केला. संबंधित गावात झालेली विकास कामे, विविध योजनांतून मंजूर केलेल्या कामाचे भूमिपूजन तसेच काही कामांचे लोकार्पण पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. गावच्या समस्यांविषयी यावेळी त्या ग्रामस्थांशी संवादही साधणार आहेत. गांव तिथे विकास दौरा संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गांव, वाडी, तांडा व वस्तीवर टप्प्याटप्प्याने जाणार आहे.

असा आहे विकास दौरा

२५ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. तपोवन, १० वा. जयगांव, १०.३० वा. जयगांव तांडा, ११.३० वा. पाडोळी, दुपारी १२.३० औरंगपूर, १.३० वा. हसनाबाद व तांडा, २.३० वा. गोवर्धन, ४ वा. खारी तांडा, ४.३० वा. जाळी तांडा, ५ वा. इनाम तांडा, सायंकाळी ६ वा. हिवरा, ७ वा. रामनगर तांडा, ७.३० वा. जळगव्हाण तांडा, ८.३० वा. जळगव्हाण व रात्रौ ९ वा. कासारवाडी रामेवाडी

२७ जानेवारी सकाळी ९ डिग्रस, १० वा. पोहनेर, ११.३० वा. बोरखेड, दुपारी १२.३० वा. तेलसमुख, १ वा. तेलसमुख तांडा, १.३० वा. तेलसमुख दलित वस्ती, २ वा. तेलसमुख तांडा क्र.(२), २.३० वा. ममदापूर तांडा, ३ वा. ममदापूर, ४ ते ५ वा. कृष्णानगर तांडा, श्रीरामनगर तांडा, गणेशनगर तांडा, ५.३० वा. कौडगांव गव्हाणे, सायंकाळी ६.३० वा. आचार्य टाकळी, रात्रौ ७.३०वा. वसंतपूर तांडा, ८ वा. कानडी आणि ९ वा. पिंपरी

२८ जानेवारी सकाळी ९ वा. सेलू सफदराबाद क्र. (१ व २), १० वा. मलनाथपूर, ११ वा. परचुंडी, दुपारी १२ वा. भिलेगांव, १ वा. रेवली तांडा, २ वा. रेवली, ४ वा. वाका, ४.३० वा. घनाळ तांडा क्र.१, ५ वा. घनाळतांडा क्र.२, सायंकाळी ५.३० वा. नाईकनगर तांडा आणि रात्रौ ७.३० वा. सिरसाळा येथे पंकजा मुंडे जाणार आहेत.