राष्ट्रवादीत जाण्यासाठी धनंजय मुंडे यांनी किती कोटी घेतले?: पंकजा मुंडे

pankaja and dhananjay munde..

टीम महाराष्ट्र देशा: भाजपशी गद्दारी करून राष्ट्रवादी मध्ये जाण्यासाठी धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीकडून किती कोटी रुपये घेतले असा पलटवार राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. बीड जिल्ह्याच राजकारण कायमच देशाच्या राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी राहिलेले आहे. आता अजून एक नवीन वाद सध्या सुरु झाला आहे. माजी मंत्री सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्याकडून १५ कोटी रुपये घेऊन आपल्याकडचे ५ सदस्य जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाला दिल्याचा गंभीर आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी काल आष्टी मध्ये केला होता त्यावर आता जोरदार वाकयुध्द रंगताना पाहायला मिळत आहे.

Loading...

पंकजा मुंडे म्हणाल्या ‘ धनंजय मुंडें यांनी केलेला सुरेश धस यांना १५ कोटी रुपये दिल्याचा आरोप धादांत खोटा व हास्यास्पद आहे. धनंजय मुंडे यांना राजकारणात आणणाऱ्या स्वर्ग. गोपीनाथ मुंडे साहेबांनी तुम्हाला अनेक पद दिलीत, आमदारकी देखील दिली पण त्यावेळी सत्ता न्हवती नाहीतर सत्ता असती तर मंत्री देखील केले असते आणि आज त्याच व्यक्तीसोबत घोर गद्दारी करून राष्ट्रवादीमध्ये गेलात तेव्हा तुम्हीच सांगा जनतेला राष्ट्रवादीकडून तुम्ही किती कोटी रुपये घेतले आहेत.’ असा तीक्ष्ण शब्दात पलटवार पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.Loading…


Loading…

Loading...