राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याची माझ्यासमोर उभं राहायची लायकी नाही : पंकजा मुंडे

लाखो मतांच्या मताधिक्याने आम्ही निवडून येवू : मुंडे

बीड: राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही स्थानिक नेत्याची माझ्यासमोर उभे राहण्याची लायकी नाही, अशी खरमरीत टीका भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. त्या मंगळवारी धारूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर अक्षरश: आगपाखड केली. त्यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्याची खिल्ली उडविली. झी २४ तास या वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

राष्ट्रवादीच्या मेळाव्याचा समाचार घेतला. स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पराभव करण्यासाठी एकदा तत्कालीन मंत्रिमंडळच बीडमध्ये तळ ठोकून होतं. पण झालं काय? तर मुंडेसाहेब लाखो मतांच्या मताधिक्याने निवडून आले. अशीच स्थिती याही वेळी कायम राहिल असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आधी त्यांच्या पक्षातली कुरघोडी थांबवावी. पक्ष एकजुट एकसंध कसा राहिल हे पहावे मग आम्हाला टक्कर द्यावी असं म्हणत पंकजा मुंडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला शह देण्यासाठी खुद्द पवारांना इथे यावं लागलं हेच आमचं यश आहे. ज्या पक्षातील नेत्यांमध्ये एकीच नाही ते आम्हाला काय टक्कर देणार? असाही प्रश्न पंकजा मुंडे यानी उपस्थित केला.

‘पवारसाहेबांची सामाजिक उंची समजण्याची बौद्धिकता पंकजा मुंडेंमध्ये नाही’

You might also like
Comments
Loading...