‘टवाळखोरांनी केलेले उद्घाटन हा तर निव्वळ बालिशपणा’

dhananjay mundhe and pankaja munde 2

टीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. परळी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार होते. मात्र धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी एक दिवस आधीच या इमारतीचं उद्घाटने केलं त्यामुळे पंकजा यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे.

धनंजय मुंडेंवर टीका करताना पंकजा यांनी ‘परळी पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसताना नियमबाह्य पद्धतीन इमारतीचे उद्घाटन काही टवाळांकडून केले. टवाळखोरांनी केलेले उद्घाटन हा तर निव्वळ बालिशपणा होता. राजकारणात असे कृत्य अशोभनीय आहे. केवळ परळीत नाही तर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या इमारतीला मी निधी दिला, यात कोणताही भेदभाव केला नाही. परळीची पंचायत समिती भाजपच्या ताब्यात असताना निधी मंजूर केला. मात्र नंतर ही पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. मात्र मी काम रखडविले नाही. मला जनतेसाठी काम करायचं आहे, श्रेयासाठी नाही अशी टीका मुंडे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, पुढे बोलताना ‘विकास कामांमध्ये खेकडा प्रवृत्तीचा विरोध करणाऱ्या श्रेयवादी लोकांना भविष्यात मी केलेल्या कामांचं रात्रीतच उद्घाटन करण्याची नामुष्की येईल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या