काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद, पंकजा मुंडेंचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

blank

टीम महाराष्ट्र देशा : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेसवर जोरदार तोंडसुख घेतले आहे. मुखेड येथील सभेत त्यांनी काँग्रेसवाले म्हणजे ब्रिटिशांची औलाद अश्या खरपूस शब्दात कॉंग्रेसचा समाचार घेतला आहे.

नांदेडचे युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेसवाले म्हणजे ब्रिटिशांची औलाद आहे. त्यांनी ब्रिटिशांप्रमाणेच देशात ‘फोडा आणि राज्य करा’ पॉलिसी राबवली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसही याच काँग्रेसचे पिल्लू आहे.’ त्यामुळे हे दोन्हीही पक्ष ब्रिटिशांप्रमाणे ‘फोडा आणि राज्य करा’ या पॉलिसीचा वापर करत आहेत अशी टीका त्यांनी केली.

तसेच भाजपने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादी जाती धर्माच्या आधारावर देशात उभी फुट पाडत असल्याचाही आरोप पंकजा मुंडे यांनी केला.