बँका तुमच्या, कारखाने तुमचे, संस्था तुमच्या मग तुम्ही हल्लाबोल कशावर करता ? पंकजा मुंडे

पुणे : बँका तुमच्या,कारखाने तुमचे,संस्था तुमच्या मग तुम्ही हल्लाबोल कशावर करता. वर्षानुवर्षे गरिबांच्या गल्ल्यावर डल्ला मारणारे आज हल्लाबोल करत आहेत. जातीपातीचे राजकारण आजवर करून राष्ट्रवादीने स्वतःच असुरक्षित राजकारण सुरक्षित  केलं. जनता भोळी असली तरी जनता वेडी नाही असा घणाघात करत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनावर जोरदार टीका केली आहे.

हडपसरमधील लोकनेते गोपीनाथराव मुंडे उद्यानाच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.राष्ट्रवादीचा लवकरच समारोपाचा कार्यक्रम होईल.त्यांचे ४ खासदार आहेत त्यातले तीन स्वतःच्या जीवावर निवडून येतात.आम्हाला गांधीजी स्वच्छता अभियानाच्या बोर्डावर पहायला आवडतात यांना नोटांवर पहायला आवडतात. गरिबांचे दुखः कमी करण्यासाठी काय केलं हे दाखवावं. भाजपला सत्ता पुन्हा स्थापन करण्याची संधी देणार असा विश्वास देखील मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

पंकजा मुंडे यांच्या भाषणातील मुद्दे

  • जे आधी गल्ला बोल म्हणायचे ते आता हल्लाबोल म्हणत आहेत.
  • मुंडेसाहेबांना ठावूक होत की त्याचं आयुष्य मोठ नाही.
  • जनतेच्या कल्याणाची जबाबदारी बाबांनी माझ्या खांद्यावर दिली आहे. बाबांची सर्व स्वप्न पूर्ण करणार
  • ग्रामीण भागात जलयुक्त शिवार योजना म्हणजे पंकजा मुंडेंची योजना असं म्हणतात,माउलींच्या डोक्यावरची घागर खाली उतरवल्याचा आनंद आहे.
  • आमचे उदयनराजे स्वतःच्या जीवावर निवडून येतात त्यांना पक्षाची गरज नाही